Friday 8 July, 2011

ययाति.

ययाति
      - वि. स.खांडेकर. 
(मेहता पब्लिशिंग हाऊस, किं. २०० रु.)

कै.विष्णू सखाराम तथा भाऊसाहेब खांडेकर यांच्या एकूण साहित्यकृतींच्या रत्नमाळेतील 'ययाति'चे स्थान मेरुमण्यासारखे आहे.
या कादंबरीचा पुराणाशी केवळ नावापुरता संबंध नाही. एका प्रसिद्ध पौराणिक उपख्यानाचे धागेदोरे घेऊन ते त्यांनी या कादंबरीत स्वतंत्र रीतीने गुंफले आहेत.
आपल्या प्रतिभेची जात,तिची शक्ती आणि तिच्या मर्यादा यांची योग्य जाणीव झालेल्या खांडेकरांनी आत्माविष्काराला योग्य अशीच कथा निवडली.ती ज्या माध्यमातून त्यांना प्रगट व्हावीशी वाटली, त्याच्यावर त्यांचे प्रभुत्व होतेच. पुराणकथांत जे भव्य-भीषण संघर्ष आढळतात, त्यांचे मंथन करण्याची अंगभूत शक्तीही त्यांच्या चिंतनात होती. जीवन जसे एका दृष्टीने क्षणभंगुर आहे, तसेच, ते दुसऱ्यादृष्टीने चिरंतन आहे;ते जितके भौतिक आहे, तितकेच आत्मिक आहे, या कठोर सत्याचे आकलनही त्यांना पूर्णत्वाने झालेले होते. त्यामुळेच एका पौराणिक कथेच्या आधाराने एक सर्वोत्तम ललितकृती कशी निर्माण करता येते, याचा आदर्श वस्तुपाठच 'ययाति'च्या रूपाने श्री. खांडेकरांनी वाचकांपुढे ठेवला आहे.
कामुक, लंपट, स्वप्नातही ज्याला संयम ठाऊक नाही, असा ययाति; अहंकारी,महत्त्वाकांक्षी, मनात दंश धरणारी आणि प्रेमभंगाने अंतरंगात द्विधा झालेली देवयानी; स्वतःच्या सुखाच्या पलीकडे सहज पाहणारी आणि ययातिवर शरीरसुखाच्या, वासानातृप्तीच्या पलीकडच्या प्रेमाचा वर्षाव करणारी शर्मिष्ठा आणि निरपेक्ष प्रेम हाच ज्याचा स्वभावधर्म होऊन बसला आहे, असा विचारी, संयमी व ध्येयवादी कच या चार प्रमुख पात्रांमधील परस्परप्रेमाची विविध स्वरूपे या कादंबरीत समर्थपणे चित्रित झालेली आहेत.
'ही कादंबरी ययातीची कामकथा आहे, देवयानीची संसारकथा आहे. शर्मिष्ठेची प्रेमकथा आहे आणि कचाची भक्तीगाथा आहे, हे लक्षात घेऊन वाचकांनी ती वाचावी,' अशी अपेक्षा स्वतः खांडेकरांनीच व्यक्त केली
आहे.      

3 comments:

  1. ययाती मराठी साहित्यातील एक अजरामर कलाकृती. उपमा, उपमेय आणि अलंकारांचे एक अद्भूत मिश्रण. ा, उपमेय आणि अलंकारांचे एक अद्भूत मिश्रण.

    ReplyDelete
  2. तुमचा हा लेख मी आधी वाचायला हवा होता, कारण मी ययाती हि कादंबरी वाचली आहे परंतु ती मी ११ वी १२ वी च्या दरम्यान वाचली होती , पण वाचण्यासाठी आवश्यक असा दृष्टीकोनाच नव्हता, त्यामुळे मला हि कादंबरी मला नीट समझ्लीच नाही , पण आता पुन्हा ती वाचेन ...
    धन्यवाद ..

    ReplyDelete
  3. mazi saglyaat awadti kadambari. Btw, hya blog chi sankalpana chhan ahe (saglech posts). Awadlay

    ReplyDelete