Thursday, 20 January, 2011

'युगंधर'


'युगंधर'
      -शिवाजी सावंत.
(कॉन्टीनेन्टल प्रकाशन,किंमत-४००रु.)श्रीकृष्ण! गेली पाच हजार वर्ष भारतीय स्त्री-पुरुषांच्या व्यक्त-अव्यक्त मनांचा तळठाव व्यापून दशांगुळे शेष उरणारी एक सशक्त विभूतीरेखा-एक युगपुरुष! श्रीकृष्ण चरित्राचे अधिकृत संदर्भ सापडतात ते मुख्यतः श्रीमदभागवत,महाभारत,हरिवंश व काही पुराणांत.या प्रत्येकात गेल्या हजारो वर्षांत सापेक्ष विचारांची,मनगढंत पुटंच पुटं चढली आहेत.त्याचं तांबूस-नीलवर्णी,सावळं,गर्भातच दुर्लभ रंगसूत्रांचे संस्कार घेतलेलं,श्रीयुक्त म्हणजे सुंदर रुपडं घनदाट झालंय.अतर्क्य चमत्कारांचे स्रोतच स्रोत नकळत्या भाबडेपणी टाकल्यामुळे.

            आज तर श्रीकृष्ण क्रमशः वास्तवापासून शेकडो योजनं दूर दूर जाऊन बसलाय.आजच्या 'भारतीय' म्हणून असलेल्या जीवनप्रणालीचा श्रीकृष्ण हा पहिला उद्गार आहे!.............
................................श्रीकृष्णाच्या मूळ जीवनसंदर्भाची मोडतोड न करता त्याचं 'युगंधरी' रूप बघता येईल का?त्याच्या स्वच्छ नीलवर्णी जीवन सरोवराचं दर्शन घेता येईल का?गीतेत त्याने विविध जीवनयोग नुसतेच सांगितले का?की त्याच्या दिव्य,गतिमान सुदर्शन चक्रासारखे प्रत्यक्ष जगूनही दाखवले?त्याच्या जीवन सरोवरातील हजारो वर्षे साठलेलं शेवाळ तर्कशुद्ध सावधपणे अलगद दूर सारलं तर त्याचं 'युगंधरी' दर्शन शक्य आहे.
             'मृत्युंजय'च्या यशःशील रचनाकाराची प्रदीर्घ चिंतन,सावध संदर्भशोधन,डोळस पर्यटन व जाणत्यांशी भाषण यांतून साकारलेली साहित्यकृती-युगंधर!!