Thursday 8 August, 2013

दाद

प्रतिभावान लेखक, वक्ता, संगीतज्ञ, काव्य-शास्त्र- विनोदाच्या मैफली रंगतदार करणारा धीमान, संगीत- नाट्य- दिग्दर्शक, एकपात्री प्रयोगाची अभिनव, बहुरूपी परंपरा निर्माण करणारा अभिनेता अशी पु. ल. देशपांडे यांची अनेक रूपे रसिकांना परिचित आहेत. ही सर्व रूपे रसिकांना अभिमुख अशी. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणखी एक अंतर्मुख रूप आहे ते एका संवेदनशील रसिक वाचकाचे. जीवनाविषयीच्या दुर्दम्य ओढीतून ते निर्माण झालेले आहे. मानवी जीवनातले नानाविध अनुभव व्यक्त करणाऱ्या पुस्तकांकडे ते म्हणूनच आकर्षित होतात. ते अनुभव समजून घेऊन त्यांतून मिळणारा आनंद वाटून टाकणे ही त्यांची सहज उर्मी आहे. त्यांच्या वाचनाला कसलेही वावडे नाही. भाषेचे नाही की वांग्मयप्रकाराचे नाही. जुन्याचे नाही की नव्याचे नाही. चांगले पुस्तक- मग ते ग्रामीण असो, नागरी असो, दलित असो, पांढरपेशा जगाचे असो, समाजातल्या कोणत्याही थरातील लेखकाने लिहिलेले असो- त्यातले वांग्मयीन सौंदर्य व भाषेचे गुण जाणवताच ते आवर्जून वाचतात. त्यांचे वाचन तेवढयावरच थांबत नाही. मग ते कधी लेखकाला उस्फूर्तपणे पत्र लिहितात, कधी पुस्तकाचा आस्वाद घेणारा लेख भरभरून, मोकळ्या मनाने लिहितात, कधी आवडलेल्या पुस्तकाला मर्मग्राही प्रस्तावना लिहितात. समीक्षेच्या या किंवा त्या तात्त्विक भूमिकातून केलेल्या रूक्ष चिकित्सेत ते शिरत नाहीत. साहित्यकृतीच्या आस्वादाला लगटून त्यांची चिकित्सा मूल्यमापन येतच असते
    इतके तऱ्हातऱ्हांचे अविरतपणे वाचणारा, वाचले त्याचा आनंद उत्साहाने सर्वांना वाटून वाढवणारा, नव्या नव्या आश्वासक लेखकांचा हुरूप द्विगुणीत करणारा ज्येष्ठ लेखक विरळा
  पु. लं. नी वेळोवेळी व्यक्त केलेल्या अशा निवडक प्रतिक्रियांचा 'दाद' हा संग्रह. याआधीच्या ' चार शब्द' या पुस्तकात त्यांनी लिहिलेल्या वेचक, आस्वादक प्रस्तावना समाविष्ट झालेल्या आहेत. या दोन संग्रहांत त्यांच्या अभिजात, संगीत- साहित्य- कलांच्या सौंदर्यात भिजलेल्या मनमोकळा प्रतिसाद देणाऱ्या रसिकतेची साक्ष पटते.
    पु. लं. ची पुस्तकांविषयीची प्रीती त्यांनी लिहिलेल्या, '… म्हणुनी ग्रंथांची आवडी' या लेखात सुंदरपणे व्यक्त झाली आहे. तो लेख या संग्रहाला प्रास्ताविक म्हणून दिला आहे.  

6 comments:

  1. thodafar vachlay he... Surekh aahe :)

    ReplyDelete
  2. Thanks for Sharing....Nakkich Vachu!! PuLancha Ek Ek Shabd Anandachya Bijansarka Asto...Vachnaryachya Manaat Toh Ekda Rujla Ki Tyacha Man Anandvan Hotach!!

    ReplyDelete
  3. Well written Spruha! Marathi typing sathi tu kuthle software waparle aahes? Google Transliterate madhe marathi typing jast easier aahe ani वाड्मय sarkhe shabda te software vyavasthit lihite. You can get it from here:

    http://www.google.com/inputtools/windows/

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks for software suggestions..I was searching such software for few months to write my blog..!! g8..helpful...

      Delete
  4. पुलंची मला सर्वात जास्त भावलेली पुस्तक म्हणजे 'वंगचित्रे' आणि 'रवींद्रनाथ :- तीन व्याख्याने'.पुलंनी ज्या रसाळपणे टागोर रंगवले तस मला कोणी अजून सापडलं नाही.'वंगचित्रे' मध्ये पुलंची रसिकता ठायी ठायी दिसते.ते वाचताना मी कित्येक दिवस जणू काही शांतीनिकेतन आणि टागोर काळात होतो.तेव्हा पुल प्रेमींनी ती जरूर वाचावीत.चार्ली चाप्लीन आणि टागोर यांना पुल आपले गुरु मानायचे.अशा गुरूच्या कर्मभूमीत बंगाली भाषा शिकायला जाऊन तिथल्या अनुभवांवरून हे पुस्तक लिहिलंय.त्यावेळीच पुलंना शर्वरी राय चौधरी सारखे प्रसिद्ध शिल्पकार मित्र म्हणून मिळाले.आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या पुस्तकातून पुलंच संगीतप्रेम जाणवत.असो बरच काही बोलता येईल त्यावर.पण, ऑगस्ट २०१३ नंतर हा ब्लॉग लिहिण बंद का केल ते कळल तर बर होईल ??

    ReplyDelete